Ad will apear here
Next
सीएम चषक युवा महासंगम तीन फेब्रुवारीला मुंबईत
पन्नास हजार जणांचा सहभाग

मुंबई : ‘राज्यातील ४३ लाख युवांचा सहभाग असलेल्या ‘सीएम चषक’ या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा मुंबई, पुणे व अहमदनगर येथे मंगळवारी सुरू झाली. मुंबईत तीन फेब्रुवारी रोजी युवा महासंगम आयोजित करण्यात आला असून, त्यात ५० हजार युवक-युवती सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन,  क्रीडामंत्री विनोद तावडे आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा महासंगम होणार आहे,’ अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी, ३० जानेवारी २०१९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस संतोष पाटील दानवे, विक्रांत पाटील, तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय उपस्थित होते.

योगेश टिळेकर म्हणाले, ‘सीएम चषक या स्पर्धेत १२ विविध प्रकारचे खेळ व कला प्रकारात ४३ लाख स्पर्धकांचे आठ लाख सामने झाले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पंचवीस ते तीस हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते. यातील क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामने २९ ते ३१ जानेवारीपर्यंत अहमदनगरमध्ये, तर कुस्तीच्या अंतिम स्पर्धा ३१ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहेत.’


मोहित भारतीय म्हणाले, ‘ मुंबईत दोन व तीन फेब्रुवारी रोजी व्हॉलीबॉल, खो – खो, कबड्डी, कॅरम, ॲथलेटिक्स, रांगोळी, चित्रकला, गीत व नृत्य याच्या अंतिम स्पर्धा होतील. मुंबईत होणाऱ्या समारोप समारंभामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ५० हजार युवक-युवती सहभागी होतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZFQBW
Similar Posts
‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी मुंबई : ‘सीएम चषक’ला महाराष्ट्र प्रदेशस्तरावरून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३२ लाख ६१ हजार ७४६ लोकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धामध्ये आपली नोंदणी केली आहे. मुंबई शहरातून सुमारे साडेपाच लाखांहूनही जास्त लोक ‘सीएम चषक’ मधल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत
‘सीएम चषका’मध्ये १४ लाख लोकांचा सहभाग मुंबई : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषका’ला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित ‘सीएम चषका’ला प्रदेशस्तरावर उत्तम प्रतिसाद मिळत असून, मुंबई
सीएम चषकच्या अंतिम सामन्यांना सुरुवात मुंबई : महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वांत मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या सीएम चषकचे राज्यस्तरीय अंतिम सामने मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात पार पडतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून एकूण ४५ लाखांहून अधिक स्पर्धकांनी सीएम चषकच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष,
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language